आईसलँड हा उत्तर अटलांटिक महासागर आणि आर्क्टिक महासागर यांच्या मधोमध वसलेला एक चिमुकला द्विपीय देश. लोकसंख्या जेमतेम साडेतीन लाख. त्यातली दोन-तृतीयांश लोकसंख्या रिकयाविक या राजधानीच्या शहरात व आजूबाजूच्या उपनगरांत एकवटलेली. देशाचा ६५% भूभाग म्हणजे वैराण टुंड्रा प्रदेश! Highlands of Iceland या नावाने ओळखला जाणारा या देशाचा मध्यवर्ती भाग उंच पर्वत, ज्वालामुखी, लाव्हा पठारे, आणि हिमनद्या यांनी व्यापलेला. देशाचे हवामान मुख्यत्वे अतिशीत, टुंड्रा प्रकारचे. दक्षिण किनारा त्यामानाने काहीसा उबदार.
Into the Desert of Jordan – Part 7 – Martian Land Wadi Rum | जॉर्डनच्या वाळवंटात – भाग ७ – मंगळभूमी वादी रम
वादी रमच्या वाळवंटातले इतर काही वैशिष्ट्यपूर्ण पहाड बघून आम्ही पाच वाजेपर्यंत कॅम्पवर पोहोचलो. डोंगरकड्याच्या आश्रयाने, एका खोलगट भागात
तो कॅम्प उभारला होता. राहण्या-जेवण्याच्या सर्व आवश्यक त्या सुविधा तिथे उपलब्ध होत्या. सामान-सुमान तंबूमध्ये टाकून आम्ही कॅम्पच्या बाहेर सूर्यास्त बघायला म्हणून येऊन थांबलो. जसजसे सूर्यबिंब क्षितिजावर सरकू लागले तसतसा आजूबाजूच्या
डोंगरकड्यांचा रंग बदलू लागला. लालबुंद झालेल्या सूर्याच्या प्रभेने ते डोंगर आणि त्याखालची वाळू अक्षरशः चमकू लागली. त्या काही क्षणांसाठी तिथले भूदृश्य म्हणजे मंगळाचा पृष्ठभाग वाटत होता. मंत्रमुग्ध होऊन आम्ही सारे निसर्गाची किमया पाहत होतो. माझ्या कॅमेराला तर जराही उसंत नव्हती.
Into the Desert of Jordan – Part 6 – Mind-boggling Petra | जॉर्डनच्या वाळवंटात – भाग ६ – अद्भुतनगरी पेट्रा
जॉर्डनमधील सर्वात लोकप्रिय पर्यटनस्थळ म्हणजे पेट्रा. जॉर्डनच्या नैऋत्य भागातील जाबाल-अल-मदबाह या डोंगररांगेत स्थित असलेले हे […]
Into the Desert of Jordan – Part 5 – The Dead Sea | जॉर्डनच्या वाळवंटात – भाग ५ – मृत समुद्र
शाळेत असताना भूगोलाच्या परीक्षेत कायम एक प्रश्न असायचा – मृत समुद्राची क्षारता सर्वाधिक आहे, भौगोलिक कारणे द्या. तेव्हा नुसती घोकलेली ती भौगोलिक कारणे आज प्रत्यक्षात अनुभवास येत होती. पश्चिम आशियाच्या शुष्क वाळवंटी प्रदेशात, जॉर्डन
आणि इस्रायल यांच्या सीमारेषेवर मृत समुद्र स्थित आहे. या समुद्राला मिळणारा गोड्या पाण्याचा एकमेव मोठा स्रोत म्हणजे जॉर्डन नदी. त्याशिवाय आसपासचे अनेक लहान-मोठे झरे या समुद्रात मिसळतात. मात्र मुळातच पर्जन्यमान कमी असल्याने त्यातून होणारा गोड्या पाण्याचा पुरवठा नगण्य असतो. जवळपास वर्षभर असणारे उष्ण हवामान व सूर्याची प्रखर किरणे यांमुळे बाष्पीभवनाचा वेगही जास्त. या सर्व कारणांमुळे मृत समुद्राची क्षारता सुमारे ३५% आहे. हे प्रमाण सरासरी समुद्रक्षारतेच्या ९ पट आहे! इतक्या
प्रचंड क्षारतेमुळे या समुद्रात कोणतेच जीव जगू शकत नाहीत. म्हणूनच यास मृत समुद्र असे म्हणतात.
Into the Desert of Jordan – Part 4 – Madaba and Mount Nebo | जॉर्डनच्या वाळवंटात – भाग ४ – मोझॅक सिटी मदाबा आणि माउंट नेबो
या असंख्य मोझॅकपैकी सर्वात महत्त्वाचा मोझॅक
म्हणजे जेरुसलेमचा नकाशा. रंगीत दगडांचे तुकडे जमिनीवर लावून हा नकाशा बनवण्यात आला. जेरुसलेमच्या पवित्र भूमीच्या आसपासचे डोंगर, नद्या, गावे, व्यापारी मार्ग अशा महत्त्वाच्या भौगोलिक व सांस्कृतिक खुणा त्यात चितारलेल्या आहेत. याच नकाशावरून संशोधकांनी जेरुसलेमच्या तत्कालीन रचनेचे प्रारूप बनवले. आज अर्धा-अधिक नष्ट झालेला हा नकाशा त्याच्याभोवती चर्च बांधून संरक्षित केला आहे. या चर्चला ‘चर्च ऑफ द मॅप’ असे म्हणतात.
Into the Desert of Jordan – Part 3 – Pompeii of the East : Jerash | जॉर्डनच्या वाळवंटात – भाग ३ – पूर्वेकडचे पॉम्पेई : जेराश
जेराशचे हे प्राचीन शहर एका बाजूला तर आधुनिक शहर
दुसऱ्या बाजूला अशी आजची रचना आहे. प्राचीन शहराच्या प्रवेशद्वारापाशी पोहोचलो
तेव्हा दुपारचे चार वाजत आले होते. प्रवेश बंद होण्यास जेमतेम १५ मिनिटे बाकी
होती. वेळेत पोहोचवल्याबद्दल सालेहचे आभार मानले आणि आत शिरलो. सारे अवशेष बघायला
माझ्याकडे दीडेक तास होता. तिकीट काढून आत शिरतोय तेवढ्यात कानावर काही बंगाली
संवाद पडले. भारतीय पर्यटक? आणि इथे? वळून पाहिले तर नवरा-बायको आणि त्यांचा १२-१३
वर्षांचा मुलगा असे कुटुंब दृष्टीस पडले.
Into the Desert of Jordan – Part 2 – Amman city and snowy road to Ajloon | जॉर्डनच्या वाळवंटात – भाग २ – अम्मान शहर आणि अजलूनची बर्फाच्छादित वाट
जाग आली तेव्हा पावणे अकरा वाजले होते. विमानप्रवासाचा ताण आणि दोन तासांनी पुढे सरकलेले घड्याळ […]
Into the Desert of Jordan – Part 1 – First day of the Trip | जॉर्डनच्या वाळवंटात – भाग १ – सहलीचा पहिला दिवस
मध्यरात्रीची वेळ असल्याने मी विमानतळापासून
हॉटेल पर्यंतची टॅक्सी आधीच आरक्षित करून ठेवली होती. ठरल्याप्रमाणे एक टॅक्सीचालक माझ्या नावाचा फलक हातात घेऊन उभा होता. साडेसहा फूट उंची, रुंद बांधा, वाढवलेली दाढी असे त्याचे रूप पाहून मला ‘जाणता राजा’ मधल्या अफझलखानची आठवण झाली. मी जरा दबकूनच त्याच्याशी हस्तांदोलन केले. त्याचे नाव होते सालेह. आपल्या मोडक्या-तोडक्या
इंग्रजीत त्याने माझे स्वागत केले. थोड्याच वेळात आमची टॅक्सी एका प्रशस्त महामार्गावरून
धावू लागली. रस्त्यावर गर्दी तुरळकच होती. मिट्ट काळोखात आजूबाजूचे काहीच दिसत नव्हते. बहुधा वाळवंट असावे.
अंधारबन Andharban trek
अंधारबन पुणे जिल्ह्यातल्या मुळशी तालुक्यात येतं.
नावाप्रमाणेच हा ट्रेक घनदाट रानातून जातो. सह्याद्रीच्या डोंगररांगा म्हणजे भारतातल्या अति-जास्त पर्जन्यवृष्टी होणाऱ्या ठिकाणांपैकी एक. त्यामुळे या परिसरात घनदाट वृक्षराजी आढळते. ही सदाहरित वने त्यांतील वैविध्यपूर्ण जीवसंपदेसाठी
प्रसिद्ध आहेत. अंधारबन चे अरण्य हे त्यातलेच एक संपन्न आणि अस्पर्शित अरण्य. पुण्याहून मुळशी जलाशयामार्गे कोकणात उतरणारा घाटरस्ता म्हणजे ताम्हिणी घाट. याच रस्त्यावरून ताम्हिणी गाव सोडलं की उजवीकडे थेट लोणावळ्याकडे जाणारा फाटा फुटतो. याच रस्त्यावर लागतं पिंप्री गाव. अंधारबनचा ट्रेक याच गावापासून सुरु होतो.
10 places in and around Heidelberg to spend a Sunday afternoon
Located at just one-hour driving distance from Frankfurt
international airport, Heidelberg is very popular among international tourists.
The town is also well-known for its university, which is ranked among top 10
universities in Germany. The university attracts a lot of international
students from all over the world. I was fortunate to get accepted for a
graduate program in Heidelberg university. During my residency of a few years
in Heidelberg, I had a chance to explore some places off the beaten track. This
blog post is about some known and some not-so-known places in and around
Heidelberg.