जाग आली तेव्हा पावणे अकरा वाजले होते. विमानप्रवासाचा ताण आणि दोन तासांनी पुढे सरकलेले घड्याळ […]
Into the Desert of Jordan – Part 1 – First day of the Trip | जॉर्डनच्या वाळवंटात – भाग १ – सहलीचा पहिला दिवस
मध्यरात्रीची वेळ असल्याने मी विमानतळापासून
हॉटेल पर्यंतची टॅक्सी आधीच आरक्षित करून ठेवली होती. ठरल्याप्रमाणे एक टॅक्सीचालक माझ्या नावाचा फलक हातात घेऊन उभा होता. साडेसहा फूट उंची, रुंद बांधा, वाढवलेली दाढी असे त्याचे रूप पाहून मला ‘जाणता राजा’ मधल्या अफझलखानची आठवण झाली. मी जरा दबकूनच त्याच्याशी हस्तांदोलन केले. त्याचे नाव होते सालेह. आपल्या मोडक्या-तोडक्या
इंग्रजीत त्याने माझे स्वागत केले. थोड्याच वेळात आमची टॅक्सी एका प्रशस्त महामार्गावरून
धावू लागली. रस्त्यावर गर्दी तुरळकच होती. मिट्ट काळोखात आजूबाजूचे काहीच दिसत नव्हते. बहुधा वाळवंट असावे.