अपरिचित हिमाचल – भाग ४ – कमरू नागचा खडतर ट्रेक | Unexplored Himachal – Part 4 – Treacherous trek to Kamru Nag

दोन-चार वळणे पार केली आणि कमरू नाग मंदिराचा प्रशस्त परिसर नजरेस पडला. हुश्श! पोहोचलो एकदाचा. डोंगर माथ्यावर एक सपाट प्रदेश होता. एका कोपऱ्यात मंदिर होते. तर त्याच्या समोरच एक तळे होते. तळ्याच्या बाजूने गोलाकार एक पायवाट बांधलेली होती. पलीकडच्या बाजूने आणखी एक वाट मंदिराकडे येताना दिसत होती. ही तीच वाट जी देवीधार आणि शिकारी देवीच्या मंदिराकडून येते. इथून बरेच लोक येताना दिसत होते. तळ्याच्या कडेने काही थोडीफार दुकाने आणि ढाबे होते. फारशी गर्दी नव्हती पण बऱ्यापैकी लोकांचा राबता होता. सगळा परिसर अतिशय रम्य वाटत होता. मी मंदिराच्या दिशेने निघालो. हेही मंदिर म्हणजे एक लहानसा चौथराच होता. देवाची मूर्ती म्हणजे एका चौकोनी दगडावर देवाची आकृती कोरलेली होती. चौथऱ्यावर छप्पर उभारले होते. सगळा अतिशय साधा प्रकार होता. पण तरीही फार छान वाटत होतं. मी दर्शन घेतलं आणि बाजूचे तळे निरखू लागलो. या तळ्यात लोकं पैसे, दागिने, वगैरे वस्तू टाकतात देवाला अर्पण करण्यासाठी. असं म्हणतात की या तळ्यात शेकडो करोडो रुपयांची संपत्ती आहे. मात्र त्याला कोणी हात लावत नाही. यातली संपत्ती कोणी बाहेर काढायचा प्रयत्न केला तर त्या व्यक्तीवर अतिशय वाईट परिस्थिती ओढवते म्हणे. असो.

अपरिचित हिमाचल – भाग २ – शिकारी देवी | Unexplored Himachal – Part 2 – Shikari Devi

शिकारी देवीचे हे मंदिर अतिशय प्राचीन मानले जाते. रोचक बाब अशी की या मंदिरावर कायमस्वरूपी छप्पर नाही. लोकांनी बऱ्याचदा मंदिरावर छप्पर बांधायचा प्रयत्न केला. पण ते कधीच टिकले नाही. आणि गंमत अशी की या जागी प्रचंड बर्फ पडत असूनही देवीच्या मूर्तीवर कधीच बर्फ साचत नाही. खरं-खोटं त्या देवीस ठाऊक. या देवीचे स्थानमाहात्म्य महाभारत काळापासूनचे. असं म्हणतात की पांडव कौरवांसोबत द्यूत खेळायला सुरुवात करणार होते तेव्हा शिकारी देवी एका सामान्य स्त्रीच्या रूपात तिथे आली आणि तिने पांडवांना द्यूत खेळू नका, याने तुम्ही सर्वस्व गमावाल असा इशारा दिला. मात्र पांडवांनी तिच्या या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केलं आणि खेळ सुरू केला. या द्यूतात पांडव नुसते हरलेच नाहीत तर त्यांना वनवास आणि अज्ञातवासही भोगावा लागला. एका अर्थाने देवीचा इशारा खरा ठरला.

नयनरम्य बाली – भाग ३ – उलूवातूचा रम्य सूर्यास्त Beautiful Bali – Part 3 – The picturesque sunset of Uluwatu

पण उलूवातूचे मुख्य आकर्षण म्हणजे मंदिर नव्हतेच मुळी. ते होते त्या जागेचे सौंदर्य आणि तिथून दिसणारा सूर्यास्त. मंदिराच्या मागेच डोंगरकडा थेट समुद्रात कोसळत होता. जवळपास चार-पाचशे फूट असेल त्या डोंगरकडयाची उंची. खाली अथांग समुद्राच्या लाटा बेभान आदळत होत्या. मस्त वारा सुटला होता. आकाश सोनेरी-गुलाबी झाले होते. बालीच्या बेटाचा हा दक्षिणेतर भाग. हा तोच हिन्दी महासागर जो कधीतरी लहानपणी कन्याकुमारीला पाहिलेला. एखाद्या बालसवंगड्याची बर्‍याच वर्षांनी भेट व्हावी आणि ओळख पटल्यावर त्याच्याशी गळाभेट व्हावी तसं वाटत होतं.

नयनरम्य बाली – भाग २ – गरुडा-विष्णु-कांचना पार्क Beautiful Bali – Part 2 – Garuda-Visnu-Kencana Park

माझं
हॉस्टेल बालीच्या कुटा भागात होतं. हा भाग पार्टिंग आणि नाईटलाइफसाठी प्रसिद्ध आहे.
आजचा अर्धा दिवस तसाही गेलाच होता. मग आज जवळच असलेले बालीच्या दक्षिण भागातले समुद्रकिनारे, गरुडा-विष्णु-कांचना पार्क, आणि उलूवातूचे प्रसिद्ध मंदिर बघायचे ठरवले. निघे निघे पर्यन्त बारा वाजलेच. स्कूटर छानच पळत होती. मुख्य म्हणजे स्कूटरच्या हॅंडलवर फोनहोल्डर दिलेला होता. त्याला प्लॅस्टिकचे कवरही होते. ही एक फारच मस्त सोय होती. गुगल नकाशावर
जिंबरान बीचचे लोकेशन टाकले आणि स्कूटर चालू केली. आठवड्यातला मधला वार असल्याने रस्त्यावर फार गर्दी नव्हती. स्वच्छ ऊन पडलं होतं. हवा तशी गरम होती पण उकाडा जाणवत नव्हता. मुंबईत डिसेंबर महिन्यात असते तसे वातावरण होते.

मध्य प्रदेशातली मुशाफिरी – भाग १० – पडावली आणि मितावली

ग्वाल्हेरच्या बाहेरील ऐतिहासिक स्थळभेटीतला माझा पुढचा थांबा होता गढी पडावली. हेही या परिसरातलं सुंदर मात्र […]

मध्य प्रदेशातली मुशाफिरी – भाग ९ – बटेश्वर मंदिर समूह

आज सहलीचा शेवटचा दिवस होता. आजचा दिवस ठरवला होता ग्वाल्हेरच्या उत्तरेकडील मोरेना जिल्ह्यातील बटेश्वर, गढी […]

मध्य प्रदेशातली मुशाफिरी – भाग ८ – ग्वाल्हेर – सास बहु मंदिर आणि इतर वास्तू

गोपाचाल पर्वत म्हणजे ग्वाल्हेर शहराच्या मधोमध स्थित असलेला एक खडकाळ डोंगर. ग्वाल्हेरचा सुप्रसिद्ध किल्ला, त्यातले […]

मध्य प्रदेशातली मुशाफिरी – भाग ४ – खजुराहोची स्थापत्यरत्ने – मैथुनशिल्पांचे रहस्य

दुसऱ्या दिवशी उठायला जरा उशीरच झाला. कोवळ्या सोनेरी उन्हाची वेळ निघून गेली होती. पण तरीही […]