नयनरम्य बाली – भाग ३ – उलूवातूचा रम्य सूर्यास्त Beautiful Bali – Part 3 – The picturesque sunset of Uluwatu

पण उलूवातूचे मुख्य आकर्षण म्हणजे मंदिर नव्हतेच मुळी. ते होते त्या जागेचे सौंदर्य आणि तिथून दिसणारा सूर्यास्त. मंदिराच्या मागेच डोंगरकडा थेट समुद्रात कोसळत होता. जवळपास चार-पाचशे फूट असेल त्या डोंगरकडयाची उंची. खाली अथांग समुद्राच्या लाटा बेभान आदळत होत्या. मस्त वारा सुटला होता. आकाश सोनेरी-गुलाबी झाले होते. बालीच्या बेटाचा हा दक्षिणेतर भाग. हा तोच हिन्दी महासागर जो कधीतरी लहानपणी कन्याकुमारीला पाहिलेला. एखाद्या बालसवंगड्याची बर्‍याच वर्षांनी भेट व्हावी आणि ओळख पटल्यावर त्याच्याशी गळाभेट व्हावी तसं वाटत होतं.

नयनरम्य बाली – भाग २ – गरुडा-विष्णु-कांचना पार्क Beautiful Bali – Part 2 – Garuda-Visnu-Kencana Park

माझं
हॉस्टेल बालीच्या कुटा भागात होतं. हा भाग पार्टिंग आणि नाईटलाइफसाठी प्रसिद्ध आहे.
आजचा अर्धा दिवस तसाही गेलाच होता. मग आज जवळच असलेले बालीच्या दक्षिण भागातले समुद्रकिनारे, गरुडा-विष्णु-कांचना पार्क, आणि उलूवातूचे प्रसिद्ध मंदिर बघायचे ठरवले. निघे निघे पर्यन्त बारा वाजलेच. स्कूटर छानच पळत होती. मुख्य म्हणजे स्कूटरच्या हॅंडलवर फोनहोल्डर दिलेला होता. त्याला प्लॅस्टिकचे कवरही होते. ही एक फारच मस्त सोय होती. गुगल नकाशावर
जिंबरान बीचचे लोकेशन टाकले आणि स्कूटर चालू केली. आठवड्यातला मधला वार असल्याने रस्त्यावर फार गर्दी नव्हती. स्वच्छ ऊन पडलं होतं. हवा तशी गरम होती पण उकाडा जाणवत नव्हता. मुंबईत डिसेंबर महिन्यात असते तसे वातावरण होते.

नयनरम्य बाली – भाग 1 – तोंडओळख आणि सहलीची सुरुवात Beautiful Bali – Part 1 – Introduction and the beginning of the trip

बाली – इंडोनेशिया या अगणित बेटांच्या देशातील एक लहानसे नयनरम्य बेट. तसं बाली पर्यटनाच्या नकाशावर […]