शाळेत असताना भूगोलाच्या परीक्षेत कायम एक प्रश्न असायचा – मृत समुद्राची क्षारता सर्वाधिक आहे, भौगोलिक कारणे द्या. तेव्हा नुसती घोकलेली ती भौगोलिक कारणे आज प्रत्यक्षात अनुभवास येत होती. पश्चिम आशियाच्या शुष्क वाळवंटी प्रदेशात, जॉर्डन
आणि इस्रायल यांच्या सीमारेषेवर मृत समुद्र स्थित आहे. या समुद्राला मिळणारा गोड्या पाण्याचा एकमेव मोठा स्रोत म्हणजे जॉर्डन नदी. त्याशिवाय आसपासचे अनेक लहान-मोठे झरे या समुद्रात मिसळतात. मात्र मुळातच पर्जन्यमान कमी असल्याने त्यातून होणारा गोड्या पाण्याचा पुरवठा नगण्य असतो. जवळपास वर्षभर असणारे उष्ण हवामान व सूर्याची प्रखर किरणे यांमुळे बाष्पीभवनाचा वेगही जास्त. या सर्व कारणांमुळे मृत समुद्राची क्षारता सुमारे ३५% आहे. हे प्रमाण सरासरी समुद्रक्षारतेच्या ९ पट आहे! इतक्या
प्रचंड क्षारतेमुळे या समुद्रात कोणतेच जीव जगू शकत नाहीत. म्हणूनच यास मृत समुद्र असे म्हणतात.
अंधारबन Andharban trek
अंधारबन पुणे जिल्ह्यातल्या मुळशी तालुक्यात येतं.
नावाप्रमाणेच हा ट्रेक घनदाट रानातून जातो. सह्याद्रीच्या डोंगररांगा म्हणजे भारतातल्या अति-जास्त पर्जन्यवृष्टी होणाऱ्या ठिकाणांपैकी एक. त्यामुळे या परिसरात घनदाट वृक्षराजी आढळते. ही सदाहरित वने त्यांतील वैविध्यपूर्ण जीवसंपदेसाठी
प्रसिद्ध आहेत. अंधारबन चे अरण्य हे त्यातलेच एक संपन्न आणि अस्पर्शित अरण्य. पुण्याहून मुळशी जलाशयामार्गे कोकणात उतरणारा घाटरस्ता म्हणजे ताम्हिणी घाट. याच रस्त्यावरून ताम्हिणी गाव सोडलं की उजवीकडे थेट लोणावळ्याकडे जाणारा फाटा फुटतो. याच रस्त्यावर लागतं पिंप्री गाव. अंधारबनचा ट्रेक याच गावापासून सुरु होतो.
Serene Croatia Part 1 | नितांतसुंदर क्रोएशिया भाग १ – झाग्रेब आणि प्लिटवित्से नॅशनल पार्क
दक्षिण पूर्व युरोपात भूमध्य समुद्राच्या किनारी
वसलेला क्रोएशिया हा एक लहानसा देश. र्वाश्रमीच्या युगोस्लाव्हिया या देशाचे विभाजन होऊन निर्माण झालेल्या ३ देशांपैकी एक. इथले हवामान मुख्यत्वे समशीतोष्ण खंडीय
आणि भूमध्य सागरी प्रकारचे. ४२ लाख लोकसंख्या असलेल्या या देशाच्या आर्थिक उत्पन्नाचा २०% स्रोत पर्यटन आहे. जवळपास ७०० किमी समुद्रकिनारा या देशाला लाभला आहे.
वेळास कासव महोत्सव Velas Turtle Festival
कोकणातल्या अनेक किनाऱ्यांवर ओलिव्ह रिडले जातीची कासवे घरटी बनवतात. कासवाच्या नैसर्गिक भक्षकांपासून, तसेच कासवाच्या पिल्लांचा बेकायदेशीर व्यापार करणाऱ्या लोकांकडून या पिल्लांना धोका होता. ‘सह्याद्री निसर्ग मित्र’ या स्वयंसेवी संस्थेने या कासवपिल्लांचे रक्षण करण्याचा प्रकल्प हाती घेतला. त्यातूनच पुढे आली ‘कासव महोत्सव’ ही अभिनव कल्पना. या संस्थेचे स्वयंसेवक नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात किनाऱ्यावरची कासवांची घरटी शोधून त्यातली अंडी बाहेर काढून सुरक्षित जागी पुरून ठेवतात. पुरलेल्या जागेवर एक टोपली उलटी करून ठेवली जाते. अंड्यांची संख्या, तारीख, वेळ वगैरे तपशील नोंदले जातात. ती जागा कुंपणाने संरक्षित केली जाते. मग दोनेक महिन्यात अंडी फुटून पिल्ले बाहेर येऊ लागतात. या कालावधीत संस्थेचे स्वयंसेवक रोज सकाळी ७ वाजता आणि संध्याकाळी ६ वाजता टोपल्या वर करून घरटी तपासतात. अंड्यांतून बाहेर आलेल्या पिल्लांना किनाऱ्यावर सोडले जाते. मग ती इवलीशी पिल्ले आपल्या दुडूदुडू चालीने समुद्रात प्रवेश करतात. हा सारा सोहळा म्हणजेच ‘कासव महोत्सव’! पर्यटकांचा या कल्पनेला उदंड प्रतिसाद लाभतो आहे.
ऱ्हाईन नदीकाठाने सायकल सफर – भाग ३ – लोरेली भेट आणि ऱ्हाईन खोऱ्याचे विहंगम दृष्य
हे गाव प्रसिद्ध आहे ‘लोरेली’ च्या दंतकथेसाठी. या गावाजवळ एक खडा पहाड आहे. या कथेनुसार लोरेली नामक सुंदर मुलीने तिच्या प्रियकराने केलेल्या विश्वासघातामुळे या पहाडावरून नदीत उडी मारून जीव दिला. तेव्हापासून लोकांना ती पहाडावर बसून गाणे गुणगुणताना दिसते. तिच्या रुपामुळे आणि गाण्यामुळे लक्ष विचलित होऊन अनेक खलाशांना अपघातग्रस्त व्हावे लागले आहे. त्यामुळे हा पहाड लोरेली पहाड अशा नावाने ओळखला जातो.
अद्भुतरम्य टेनेरीफं – भाग ४ – रमणीय अनागा टेकड्या
पुढचा दिवस ठरला होता अनागा टेकड्यांमधल्या भटकंतीसाठी. टेनेरीफं बेटाच्या ईशान्येकडचा डोंगराळ भाग अनागा म्हणून ओळखला […]