दोन-चार वळणे पार केली आणि कमरू नाग मंदिराचा प्रशस्त परिसर नजरेस पडला. हुश्श! पोहोचलो एकदाचा. डोंगर माथ्यावर एक सपाट प्रदेश होता. एका कोपऱ्यात मंदिर होते. तर त्याच्या समोरच एक तळे होते. तळ्याच्या बाजूने गोलाकार एक पायवाट बांधलेली होती. पलीकडच्या बाजूने आणखी एक वाट मंदिराकडे येताना दिसत होती. ही तीच वाट जी देवीधार आणि शिकारी देवीच्या मंदिराकडून येते. इथून बरेच लोक येताना दिसत होते. तळ्याच्या कडेने काही थोडीफार दुकाने आणि ढाबे होते. फारशी गर्दी नव्हती पण बऱ्यापैकी लोकांचा राबता होता. सगळा परिसर अतिशय रम्य वाटत होता. मी मंदिराच्या दिशेने निघालो. हेही मंदिर म्हणजे एक लहानसा चौथराच होता. देवाची मूर्ती म्हणजे एका चौकोनी दगडावर देवाची आकृती कोरलेली होती. चौथऱ्यावर छप्पर उभारले होते. सगळा अतिशय साधा प्रकार होता. पण तरीही फार छान वाटत होतं. मी दर्शन घेतलं आणि बाजूचे तळे निरखू लागलो. या तळ्यात लोकं पैसे, दागिने, वगैरे वस्तू टाकतात देवाला अर्पण करण्यासाठी. असं म्हणतात की या तळ्यात शेकडो करोडो रुपयांची संपत्ती आहे. मात्र त्याला कोणी हात लावत नाही. यातली संपत्ती कोणी बाहेर काढायचा प्रयत्न केला तर त्या व्यक्तीवर अतिशय वाईट परिस्थिती ओढवते म्हणे. असो.
अपरिचित हिमाचल – भाग २ – शिकारी देवी | Unexplored Himachal – Part 2 – Shikari Devi
शिकारी देवीचे हे मंदिर अतिशय प्राचीन मानले जाते. रोचक बाब अशी की या मंदिरावर कायमस्वरूपी छप्पर नाही. लोकांनी बऱ्याचदा मंदिरावर छप्पर बांधायचा प्रयत्न केला. पण ते कधीच टिकले नाही. आणि गंमत अशी की या जागी प्रचंड बर्फ पडत असूनही देवीच्या मूर्तीवर कधीच बर्फ साचत नाही. खरं-खोटं त्या देवीस ठाऊक. या देवीचे स्थानमाहात्म्य महाभारत काळापासूनचे. असं म्हणतात की पांडव कौरवांसोबत द्यूत खेळायला सुरुवात करणार होते तेव्हा शिकारी देवी एका सामान्य स्त्रीच्या रूपात तिथे आली आणि तिने पांडवांना द्यूत खेळू नका, याने तुम्ही सर्वस्व गमावाल असा इशारा दिला. मात्र पांडवांनी तिच्या या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केलं आणि खेळ सुरू केला. या द्यूतात पांडव नुसते हरलेच नाहीत तर त्यांना वनवास आणि अज्ञातवासही भोगावा लागला. एका अर्थाने देवीचा इशारा खरा ठरला.
Beautiful Bali – Part 3 – The picturesque sunset of Uluwatu | नयनरम्य बाली – भाग ३ – उलूवातूचा रम्य सूर्यास्त
पण उलूवातूचे मुख्य आकर्षण म्हणजे मंदिर नव्हतेच मुळी. ते होते त्या जागेचे सौंदर्य आणि तिथून दिसणारा सूर्यास्त. मंदिराच्या मागेच डोंगरकडा थेट समुद्रात कोसळत होता. जवळपास चार-पाचशे फूट असेल त्या डोंगरकडयाची उंची. खाली अथांग समुद्राच्या लाटा बेभान आदळत होत्या. मस्त वारा सुटला होता. आकाश सोनेरी-गुलाबी झाले होते. बालीच्या बेटाचा हा दक्षिणेतर भाग. हा तोच हिन्दी महासागर जो कधीतरी लहानपणी कन्याकुमारीला पाहिलेला. एखाद्या बालसवंगड्याची बर्याच वर्षांनी भेट व्हावी आणि ओळख पटल्यावर त्याच्याशी गळाभेट व्हावी तसं वाटत होतं.
Beautiful Bali – Part 2 – Garuda-Visnu-Kencana Park | नयनरम्य बाली – भाग २ – गरुडा-विष्णु-कांचना पार्क
माझं
हॉस्टेल बालीच्या कुटा भागात होतं. हा भाग पार्टिंग आणि नाईटलाइफसाठी प्रसिद्ध आहे.
आजचा अर्धा दिवस तसाही गेलाच होता. मग आज जवळच असलेले बालीच्या दक्षिण भागातले समुद्रकिनारे, गरुडा-विष्णु-कांचना पार्क, आणि उलूवातूचे प्रसिद्ध मंदिर बघायचे ठरवले. निघे निघे पर्यन्त बारा वाजलेच. स्कूटर छानच पळत होती. मुख्य म्हणजे स्कूटरच्या हॅंडलवर फोनहोल्डर दिलेला होता. त्याला प्लॅस्टिकचे कवरही होते. ही एक फारच मस्त सोय होती. गुगल नकाशावर
जिंबरान बीचचे लोकेशन टाकले आणि स्कूटर चालू केली. आठवड्यातला मधला वार असल्याने रस्त्यावर फार गर्दी नव्हती. स्वच्छ ऊन पडलं होतं. हवा तशी गरम होती पण उकाडा जाणवत नव्हता. मुंबईत डिसेंबर महिन्यात असते तसे वातावरण होते.
Rangilo Rajasthan – Part 4 – At the one and only hill station of Rajasthan – Mount Abu
After exploring the City of Lakes and its outskirts, it was time to venture out […]
Rangilo Rajasthan – Part 3 – Kumbhalgarh and Ranakpur
Today’s day was decided for Kumbhalgarh and Ranakpur. Kumbhalgrah is one of the legendary forts […]
Traversing Madhya Pradesh – Part 10 – Padavali and Mitawali | मध्य प्रदेशातली मुशाफिरी – भाग १० – पडावली आणि मितावली
असे म्हणतात की त्या काळी सूर्याच्या अयन रेषेच्या आधाराने गणित आणि खगोलशास्त्राचे प्रशिक्षण देण्यासाठी या मंदिराच्या वास्तूचा प्रयोग केला जाई. त्या काळी तंत्र परंपरेचा मोठा प्रभाव होता. या परंपरेचे साधक चौसष्ठ योगिनींची पूजा करत. योगिनींची पूजा करणारा हा संप्रदाय कमालीच्या गुप्ततेत असे. आजच्या घडीला या परंपरेचे कोणी उपासक अस्तित्वात आहेत की नाही याची काहीच कल्पना नाही. त्यांचे विधी, पूजा-अर्चा इत्यादींविषयी बाहेरील माणसाला कोणती माहिती मिळणे दुरापास्त. त्यामुळे या मंदिराविषयीही फार काही माहिती उपलब्ध नाही. किंबहुना १९४० पर्यंत हे मंदिर गुलदस्त्यातच होते.
Traversing Madhya Pradesh – Part 9 – Bateshwar Temple Complex | मध्य प्रदेशातली मुशाफिरी – भाग ९ – बटेश्वर मंदिर समूह
पहिला थांबा होता बटेश्वर मंदिर समूह. इथे साधारण सातव्या ते आठव्या शतकात गुर्जर प्रतिहार राजवटीत बांधली गेलेली सुमारे २०० मंदिरे आहेत. तेराव्या शतकात ही मंदिरे सम्पूर्ण जमीनदोस्त झाली. त्याचे कारण नक्की मुस्लीम आक्रमणे होते की भूकंप हे नक्की सांगता येत नाही. मात्र एकोणिसाव्या शतकात जेव्हा ही जागा पुन्हा निदर्शनास आली तेव्हा इथे दगडांचा नुसता ढिगारा होता. २००५ मध्ये के के मुहम्मद या ASI च्या अधिकाऱ्याने या मंदिरांची पुन्हा उभारणी करण्याचा विडा उचलला. तेव्हा हा सगळा भाग चंबळ खोऱ्यातील दरोडेखोरांच्या हातात होता. मुळातच हा भाग कित्येक दशकांपासून दरोडेखोरांसाठी कुप्रसिद्ध होता. मात्र मुहम्मद यांनी त्यांच्या म्होरक्याला हे समजावले की मंदिरे त्यांच्या पूर्वजांनी बांधलेली आहेत. मग तो पुनर्स्थापनेस मदत करण्यास राजी झाला.
Traversing Madhya Pradesh – Part 8 – Gwalior – Sas-Bahu temple and other ruins | मध्य प्रदेशातली मुशाफिरी – भाग ८ – ग्वाल्हेर – सास बहु मंदिर आणि इतर वास्तू
गोपाचाल पर्वत म्हणजे ग्वाल्हेर शहराच्या मधोमध स्थित असलेला एक खडकाळ डोंगर. ग्वाल्हेरचा सुप्रसिद्ध किल्ला, त्यातले प्रेक्षणीय महाल, काही मंदिरे, आणि जैन शिल्पे याच डोंगरावर आहेत. मन मंदिर महाल आणि किल्ल्याचा मुख्य दरवाजा पाहून आम्ही आलो सास-बहु मंदिराकडे. नावावरून वाटेल हे मंदिर सासू-सुनेचे आहे की काय. पण प्रत्यक्षात हे नाव म्हणजे सहस्रबाहूचा अपभ्रंश आहे. मंदिराचा बराचसा भाग नष्ट झालेला आहे. शिल्लक अवशेष म्हणजे मंडपाचा भाग असावा. बाहेरून इतक्या सुबक दिसणाऱ्या मंदिराची आतली कलाकुसर किती विलक्षण असेल या उत्सुकतेने आम्ही आत शिरलो.
Traversing Madhya Pradesh – Part 4 – Secrets of Erotic Sculptures at Khajuraho | मध्य प्रदेशातली मुशाफिरी – भाग ४ – खजुराहोतील मैथुनशिल्पांचे रहस्य
खजुराहोची मंदिरे जगभर प्रसिद्ध होण्यामागचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे यांवर असलेली मैथुनशिल्पे. एकूण शिल्पाकृतींपैकी १०% शिल्पाकृती या मैथुन म्हणजेच कामक्रीडेशी संबंधित आहेत. जवळपास सर्वच मंदिरांवर ही शिल्पे आढळतात. भारतीय समाजात आजही सेक्स हा विषय फारसा मोकळेपणाने बोलला जात नाही. कामेच्छा म्हणजे वासना आणि ती हीनच असा सर्वसाधारण हेका दिसतो. त्या पार्श्वभूमीवर आपल्या पूर्वजांनी मंदिरांसारख्या वास्तूंवर केलेले मानवी कामजीवनाचे हे उत्कट चित्रण विशेष महत्त्वाचे ठरते. खरेच प्राचीन भारत सेक्सबाबत उदारमतवादी होता का?