पायर्या संपत आल्या आणि समोर बघतो तर काय, वेगाने आदळणार्या लाटा आणि त्यांचे उंच उडणारे तुषार. बीच गेला कुठे? भरतीच्या पाण्याचा आवेग एवढा प्रचंड होता की पाण्याने सगळा बीचच गिळून टाकला होता. बरेचसे पर्यटक तिथेच हताशपणे पायर्यांवर उभे होते. काही जण तसेच माघारी वळत होते. तसे उजव्या बाजूने थोड्याफार उरल्यासुरल्या वाळूवर जाता येत होते. पण लाटा एवढ्या उंच होत्या की दोन सेकंदांत माणूस चिंब भिजून जाईल. पाहिल्याच बीचवर भिजायची बिलकुल
इच्छा नव्हती. आता काय? माझी चांगलीच फजिती झाली होती.