दुपारनंतर पाऊस कमी झाल्याचे दिसताच मी डुब्रोवनिकची सुप्रसिद्ध तटबंदी (city wall) बघायला निघालो. ही तटबंदी इसवी सनाच्या नवव्या शतकात बांधली गेली. उत्तरोत्तर त्यात सुधारणा करत ती अधिक भक्कम बनवण्यात आली. तिचे आजचे स्वरूप हे सोळाव्या शतकात तुर्की आक्रमकांपासून संरक्षणासाठी केल्या गेलेल्या योजनेचा भाग आहे. २ किमी परीघ आणि २५ मीटर पर्यंत उंच असलेल्या या
तटबंदीवरून फिरणे हे डुब्रोवनिक मधले सर्वात लोकप्रिय आकर्षण आहे. मी कॅमेरा सरसावून तटबंदीवर चढलो. नुकताच पाऊस पडून गेल्याने वातावरणात एक सुखद गारवा होता. इतक्या उंचीवरून शहरातली घरे, रस्ते, चर्च, घड्याळी मनोरा वगैरे सारे फारच मोहक दिसत होते.
Serene Croatia Part 3 | नितांतसुंदर क्रोएशिया भाग ३ – मोड्रिक गुहेतील थरारक सफर
अर्ध्या तासातच आम्ही गावाजवळ पोहोचलो. मारयान हा एक प्रशिक्षित आणि अनुभवी गुहावलोकन तज्ञ होता. त्याने आम्हाला गुहेत जाण्यासाठीचे कपडे आणि उंच बूट दिले. शिवाय हेल्मेट, एक मजबूत दोरी वगैरे साधने दिली. हेल्मेटवर पुढच्या भागात एक छोटी ज्योत तेवत होती. हा होता आमचा हेड-लॅम्प! बाजारात स्वस्तात मिळणारे LED दिवे म्हणजे रयानसाठी चेष्टेचा विषय होता. ज्योतीमुळे पडणारा पिवळसर प्रकाश गुहेत जो अनुभव देतो त्याची मजा LED दिव्याने येत नाही असं त्याचं मत होतं.
Serene Croatia Part 2 | नितांतसुंदर क्रोएशिया भाग २ – झदार आणि कोर्नाती द्वीपसमूह
माझा क्रोएशिया सहलीतला पुढचा मुक्काम होता झदार. हे शहर एड्रीयाटिक समुद्राच्या किनाऱ्यावर वसले आहे. रोमन साम्राज्यकालीन अवशेषांसाठी
प्रसिद्ध असलेले हे शहर क्रोएशियातील आजतागायत लोकवस्ती असलेले सर्वात प्राचीन शहर आहे. प्लिटवित्से नॅशनल पार्कवरून बसने मी झदारच्या दिशेने निघालो. रस्ता डोंगराळ भागातून नागमोडी वळणे घेत पुढे जात होता. डोंगरमाथ्यावर अजूनही बर्फ दिसत होता. आसपासची झाडे वसंत ऋतूच्या आगमनासाठी सज्ज झालेली दिसत होती. तेवढ्यात एक बोगदा लागला. बोगद्यातून बाहेर पडताच आजूबाजूचे दृश्य एकदम पालटून गेल्यासारखे वाटू लागले.
Serene Croatia Part 1 | नितांतसुंदर क्रोएशिया भाग १ – झाग्रेब आणि प्लिटवित्से नॅशनल पार्क
दक्षिण पूर्व युरोपात भूमध्य समुद्राच्या किनारी
वसलेला क्रोएशिया हा एक लहानसा देश. र्वाश्रमीच्या युगोस्लाव्हिया या देशाचे विभाजन होऊन निर्माण झालेल्या ३ देशांपैकी एक. इथले हवामान मुख्यत्वे समशीतोष्ण खंडीय
आणि भूमध्य सागरी प्रकारचे. ४२ लाख लोकसंख्या असलेल्या या देशाच्या आर्थिक उत्पन्नाचा २०% स्रोत पर्यटन आहे. जवळपास ७०० किमी समुद्रकिनारा या देशाला लाभला आहे.