Wild Trail of Kudremukh – Part 3 – Climbing the Summit | कुद्रेमुखची रानवाट – भाग ३ – शिखर आरोहण

हळूहळू आम्ही शिखरापर्यंत पोहोचलो. कुद्रेमुखच्या सर्वोच्च जागेचा फलक तिथे लावलेला होता. या जागेवरून आजूबाजूला केवळ ढग दिसत होते. संपूर्ण व्हाईट-आउट! इथून कुद्रेमुखच्या गोलाकार टेकड्यांचे सुरेख दृश्य दिसते म्हणे. मात्र आज ढगांनी आमचे दृश्य अडवले होते. भर पावसाळ्यात अजून काय नशिबात असणार म्हणा. वाऱ्याच्या अंगातले थेंबांचे बाण आता मशीनगनमध्ये अपग्रेड झाले होते. शिखरावर पोहोचल्याचा आनंद होताच, मात्र तो तिथे थांबून साजरा करणं अशक्य होत होतं. आम्ही जमतील तसे फोटो काढले आणि खाली उतरायला सुरुवात केली. जिथून तीव्र उतार सुरु होत होता तिथे थांबलो आणि जेवणाच्या पिशव्या उघडल्या. सपाटून भूक लागली होती. कुठे बसावं तर आजूबाजूला चिखलाने माखलेला नुसता बोडका कातळ होता. मग उभ्या-उभ्याच खायला सुरुवात केली. त्या थंड ओल्या हवेत उभ्या-उभ्या लेमन राईसचे बकाणे भरण्यात काही वेगळीच मजा होती. 

Wild Trail of Kudremukh – Part 2 – Entering the Shola Ecosystem | कुद्रेमुखची रानवाट – भाग २ – शोला परिसंस्थेत प्रवेश

मुलोडी गावात चहा-नाश्ता उरकून आम्ही ट्रेकसाठी सज्ज झालो. पाऊस अधून-मधून कोसळत होता. वातावरण कुंद होते. […]

Wild trail of Kudremukh – Part 1 – Introduction and start of the trek | कुद्रेमुखची रानवाट – भाग १ – तोंडओळख आणि ट्रेकची सुरुवात

कुद्रेमुख हे एक १८९४ मीटर उंचीचे शिखर. हे कर्नाटकातल्या चिकमगळूर जिल्ह्यात येते. इथल्या कमी उंचीवरच्या टेकड्यांवर आणि दऱ्यांमध्ये घनदाट पर्जन्यवने आहेत तर अधिक उंचीवरच्या पठारी भागावर गवताळ वने आढळतात. या गवताळ प्रदेशास शोला ग्रासलँड असे संबोधतात. पावसाळ्यात हा गवताळ प्रदेश हिरव्यागार कुरणांनी बहरून जातो. पश्चिम घाटातली ही एकमेकाद्वितीय अशी परिसंस्था अनेक प्रदेशनिष्ठ सजीवांना आसरा देते. उदाहरणच द्यायचे झाले तर वान्दरू (Lion-tailed macaque; Macaca silenus) हे वानर केवळ केरळ आणि कर्नाटक राज्यांतील पर्जन्यवनांत आढळते. या वानराचा कुद्रेमुख म्हणजे सगळ्यात उत्तरेकडचा अधिवास. वानराची ही प्रजात संकटग्रस्त अवस्थेत आहे. त्यामुळेच हा सगळा प्रदेश राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित केलेला आहे. याव्यतिरिक्त मलबार जायंट स्क्विरल, बायसन, अस्वल, बिबट्या असे असंख्य प्राणी आणि औषधी वनस्पती व रानफुले इथे आढळतात. अशा संपन्न प्रदेशात ट्रेकिंग करायला मी फारच उत्सुक होतो.