हाफ मून बीचवरच्या विश्रांतीनंतर आम्ही पुढच्या बीचकडे निघालो. समोर अर्थातच एक टेकडी दिसत होती. ही आत्तापर्यंतची सगळ्यात उंच टेकडी असेल. वाटेने गर्द झाडी होती. चांगला तास लागला वर चढायला. आता पुढची वाट टेकडीच्या धारेने जात होती. डाव्या हाताला समुद्र गर्जत होता. उतारावर वाढलेली माडाची झाडं मोठ्या कसोशीने वाऱ्याशी झुंज देत उभी होती. थोड्या वेळातच वाट पुन्हा गर्द झाडीत शिरली. पानांच्या जाळीतून दुपारचं कडक उन हिरवं होऊन खाली झिरपत होती. लाल मातीतली पायवाट आणि ते हिरव्या छटेचं उन एक वेगळीच वातावरणनिर्मिती करीत होते. आता वाट उतरू लागली. हळूहळू झाडांची दाटी कमी होऊ लागली आणि समुद्र दिसू लागला.
Beach trail of Karnataka: Kumta to Gokarna – Part 4 – Pristine beaches of Gokarna | कर्नाटकातली किनाराभ्रमंती : कुमटा ते गोकर्ण – भाग ४ – गोकर्णचे नयनरम्य किनारे
आजची वाट कालच्यापेक्षा कमी अंतराची होती. पण चढ-उतार जास्त होते. वेलेकन बीचला समांतर वाटेने आम्ही गोकर्णच्या दिशेने चालू लागलो. काल सूर्यास्ताच्या वेळी सूर्य ज्या टेकडीने झाकला होता ती आता समोर उभी ठाकली होती. आतापर्यंतच्या टेकड्यांच्या तुलनेत ही टेकडी बरीच उंच होती. वाटेने गच्च झाडी होती. त्यामुळे वातावरणात दमट उष्मा जाणवत होता. समुद्रावरचा वारा दूर कुठेतरी अडकून पडला होता. कपाळावर जमा होणारे घामाचे थेंब पुसत आम्ही वर चढत होतो. अर्ध्या तासातच माथ्यावर पोहोचलो. अगदी सह्याद्रीतल्या ट्रेकसारखं वाटत होतं. आजूबाजूला झाडी होती आणि समुद्राचा कुठे काही पत्ताच नव्हता!
Beach trail of Karnataka: Kumta to Gokarna – Part 3 – Nirvana Beach and a beautiful sunset | कर्नाटकातली किनाराभ्रमंती : कुमटा ते गोकर्ण – भाग ३ – निर्वाणा बीच आणि एक रम्य सूर्यास्त
तेवढ्यात समोर एक लहानसे मंदिर दिसले. मंदिरातून कानडी भक्तीसंगीताच्या सुरावटी ऐकू येत होत्या. काही स्थानिक बायका शुचिर्भूत होऊन मंदिरात दर्शनासाठी आल्या होत्या. खालून वाहणारी नदी, पलीकडचा गरजणारा समुद्र, मंद वाहणारा वारा, अस्ताला जाणाऱ्या सूर्याने केशरी-गुलाबी रंगात रंगवलेले आकाश, आणि मंदिरात लागलेले ते मधुर भक्तीसंगीत. नाटकातल्या कलाकारांनी एकत्र येऊन मंचावर एखादे दृश्य साकारावे आणि प्रत्येकाने आपल्या अदाकारीने ते दृश्य खुलवावे तसे निसर्गातले ते एकक त्या भूदृश्याला आपापला रंग बहाल करत होते. त्याक्षणी इतकं प्रसन्न वाटलं की शरीराचा थकवा जणू त्या रंगांमध्ये विरघळून गेला असावा. उजवीकडे वळण घेऊन खाली उतरलो तर आणखी एक अप्रतिम दृश्य स्वागताला हजर होते. दोन बाजूंना टेकड्या आणि मध्ये एक लहानसा अंतर्वक्र बीच दिसत होता. हाच होता वेलेकन बीच.
Beach trail of Karnataka: Kumta to Gokarna – Part 2 – Calm beaches and Dolphins | कर्नाटकातली किनाराभ्रमंती : कुमटा ते गोकर्ण – भाग २ – शांत समुद्रकिनारे आणि डॉल्फिन दर्शन
कुमटा गावातल्या कुमटा बीचवरून आम्ही ट्रेकला सुरुवात केली. साडेअकरा वाजले होते. मध्यान्हीचं उन तळपत होतं. समुद्रावरचा वाराही निपचित पडला
होता. बाजूच्या कोळीवाड्यात खारवलेले मासे कायला ठेवले होते. त्याचा वास काहीसा अस्वस्थ करत होता. आम्ही किनाऱ्याला समांतर रस्त्याने पुढे चाललो होतो. थोड्या वेळाने एक चढण घेऊन वाट लहानशा टेकाडावर येऊन पोहोचली. इथून कुमटा गाव फारच सुंदर दिसत होते. इथे काही बसायला बाकं आणि पार्किंगची जागा होती. कदाचित स्थानिक लोकांची संध्याकाळी फिरायला येण्याची जागा असावी.
Beach trail of Karnataka: Kumta to Gokarna – Part 1 – Serene train journey and start of the trek | कर्नाटकातील किनाराभ्रमंती : कुमटा ते गोकर्ण – भाग १ – रम्य ट्रेनप्रवास आणि ट्रेकची सुरुवात
मडगाव आलं तशी गाडी ऐंशी टक्के रिकामी झाली. मग काय, मी पळालो दारात. दारात उभं राहून धावत्या गाडीचा आनंद घेणं यासारखी दुसरी मजा नाही. तो झोंबणारा वारा, वळणावरून गाडी जाताना दिसणारे पुढचे-मागचे डबे, आजूबाजूच्या गावांतली उगाचच ट्रेनकडे बघून हात हलवणारी लहान मुले, गाडी अचानक बोगद्यात शिरली की दाटून येणारा अंधार, सारेच कसे गंमतीदार! वयाने कितीही आकडे ओलांडले तरी यातली गंमत कधी कमी झाली नाही. एकदा तिथे उभं राहिलं की गाडीच्या त्या बेसूर धडधडीतही लय सापडू लागते. पुलावरून गाडी जाताना घुमणारा आवाज एक्स्ट्रा बास सारखा वाटू लागतो.