पहाडी भाषेत बुग्याल म्हणजे कुरण. हिमालयात साधारण ३५०० मीटर उंचीवर वृक्षरेषा आणि ४००० मीटरच्या आसपास हिमरेषा दिसून येते. याच्या मधल्या टप्प्यात विस्तीर्ण कुरणे आढळून येतात. वेगवेगळ्या प्रदेशांत या भूभागास वेगवेगळी नावे आहेत. जसे काश्मीरमध्ये त्याला मर्ग म्हणतात. सोनमर्ग आणि गुलमर्ग ही प्रसिद्ध ठिकाणे अशाच विस्तीर्ण कुरणांमध्ये वसलेली आहेत. उत्तराखंडमधली बुग्याल ही दुर्गमतेमुळे कायमस्वरूपी मानवी वस्तीसाठी अनुकूल नाहीत. आसपासच्या गावांतले लोक गुरेचराईसाठी या कुरणांचा पुरेपूर उपयोग करून घेतात. थंडीच्या दिवसांत बर्फाखाली असलेली ही कुरणे वसंत ऋतूत ताजीतवानी होतात आणि नानाविध रानफुलांनी बहरून जातात. मग उन्हाळ्यात कुराणांना हिरवं तेज चढतं. उत्तराखंड मधले प्रसिद्ध ट्रेकिंगचे मार्ग या नयनरम्य बुग्यालमधून जातात. रूपकुंडच्या मार्गातील अली बुग्याल आणि बेदिनी बुग्याल ही कुरणे ट्रेकिंग समुदायात प्रचंड लोकप्रिय आहेत.
Unforgettable Roopkund – Part 2 – Lohajung to Didna: Curtain Raiser of Roopkund | अविस्मरणीय रूपकुंड – भाग २ – लोहाजुंग ते डिडना : रूपकुंडची रंगीत तालीम
हर हर महादेवची आरोळी ठोकली आणि आम्ही ट्रेकला सुरुवात केली. वाट मुख्य रस्त्याच्या उजव्या बाजूने खाली उतरत होती. ट्रेकचा पहिला एक चतुर्थांश भाग उताराचा होता. एका अर्थाने चांगलंच होतं. Acclimatization साठी अशी सोपी सुरुवात असणं नेहमीच चांगलं. काही वेळातच गाव मागे पडलं आणि घनदाट अरण्य सुरु झालं. दूरवर नंदा घुंटी शिखर दिसत होतं. आम्हा ट्रेकर्सची लगबग मिश्कीलपणे पाहत होतं. मधेच एखाद्या सपाट जागी थोडीफार वस्ती आणि शेती दिसत होती. कधी गर्द झाडीतून मंद खळखळ करत वाहणारे झरे लागत होते. रानात अधेमध्ये ऱ्होडोडेंड्रॉन ची लालभडक फुले फुललेली दिसत होती. वाटेत एका वस्तीजवळ जरा वेळ विसावलो. त्या जागेवरून दूरवर डिडना गाव दिसत होते. लोहाजुंगवरून जेवढे खाली उतरलो होतो तेवढेच किंवा त्यापेक्षा किंचित जास्त वर चढायचे होते. आत्तापर्यंत रमत गमत चाललेला ट्रेक आता खरा इंगा दाखवणार होता. मनाची तयारी करून आम्ही चढणीच्या वाटेला लागलो.
Unforgettable Roopkund – Part 1 – Start of the Trek | अविस्मरणीय रूपकुंड – भाग १ – ट्रेकचा श्रीगणेशा
रूपकुंड म्हणजे उत्तराखंड मधील चमोली जिल्ह्यातील सुमारे ५००० मीटर उंचीवरील एक लहानसे हिम-सरोवर. त्रिशूल आणि नंदा घुंटी या दोन शिखरांच्या मध्ये वसलेले हे सरोवर उत्तराखंड मधले एक लोकप्रिय ट्रेकिंग स्थळ आहे. ट्रेकिंग चा बराचसा मार्ग अति उंचीवरील असल्याने तशी शारीरिक क्षमता असणे आवश्यक होते. त्यामुळे मी महिनाभर आधीपासून तयारी सुरु केली. जिम मध्ये पायांच्या व्यायामावर जास्त भर द्यायला सुरुवात केली. रोजच्या गडबडीत जिमला नियमित जाणे शक्य होत नव्हते. म्हणून ऑफिसमधून येताना किमान ५ किमी चालत यायला सुरुवात केली. मुंबईतला दमट उकाडा आणि चार पावलं चालल्यावर लागणाऱ्या घामाच्या धारा असह्य होत होत्या. कधी एकदा थंडगार जागी जातोय असं वाटत होतं.
Chalukya City Badami – Part 5 – Bhootnath temple complex and South Fort | चालुक्यनगरी बदामी – भाग ५ – भूतनाथ मंदिरसमूह आणि दक्षिण किल्ला
पट्टदकल आणि ऐहोळेची सहल तशी अपेक्षेपेक्षा लवकरच संपली. ऐहोळेमधली शेकडो मंदिरे जेवढी पहाल तेवढी कमीच. […]
Chalukya City Badami – Part 4 – Aihole, the Laboratory of Temple Architecture | चालुक्यनगरी बदामी – भाग ४ – मंदिरस्थापत्यकलेची प्रयोगशाळा – ऐहोळे
पट्टदकलमधल्या एकाहून एक सुबक मंदिरांची सफर पूर्ण करून मी आता ऐहोळेच्या दिशेने निघालो होतो. हे […]
Chalukya City Badami – Part 3 – Pattadakal | चालुक्यनगरी बदामी – भाग ३ – पट्टदकल
आजचा दिवस पट्टदकल आणि ऐहोळे या दोन जागा आणि तिथल्या मंदिरांसाठी ठरवला होता. बदामीपासून पट्टदकल […]
Chalukya City Badami – Part 2 – Shiva temples and cave temples of Badami | चालुक्यनगरी बदामी – भाग २ – शिवालये आणि गुंफा मंदिरे
उच्च शिवालयाकडे जाणारी वाट एव्हाना चार वाजत आले होते. उन्हं कलती व्हायला लागली होती. उत्तर […]
Chalukya City Badami – Part 1- Starting the historical trip | चालुक्यनगरी बदामी – भाग १ – ऐतिहासिक सहलीची सुरुवात
सव्वीस जानेवारीची पहाट. अर्धा तास उशिराने धावत असलेली सोलापूर सुपरफास्ट अखेरीस सोलापूर स्थानकात शिरली. आपली […]
Icy Marvels of Iceland – Part 5 – Golden Circle of Iceland | बर्फाळलेले आईसलँड – भाग ५ – आईसलँडचे सुवर्ण वर्तुळ
काल ठरलेल्या बेताप्रमाणे मी, फिलीप, क्लारा आणि मॅगी सकाळी बरोब्बर ७ वाजता हॉस्टेलमधून बाहेर पडलो. […]
Icy Marvels of Iceland – Part 4 – Skogafoss and Thorsmork National Park | बर्फाळलेले आईसलँड – भाग ४ – स्कोगाफोस आणि थोर्समोर्क नॅशनल पार्क
आजचा दिवस ठरवला होता आईसलँडच्या दक्षिण भागातील प्रेक्षणीय स्थळांसाठी. कालच्यासारखीच सकाळी आठ वाजता रिकयाविकच्या मुख्य […]