पुढच्या दिवशी ठरलेल्या वेळेप्रमाणे सालेह गाडी
घेऊन हॉटेलवर हजर झाला. दास कुटुंबियांना त्यांच्या हॉटेलवरून पिक-अप करून आम्ही
मदाबाच्या दिशेने निघालो. मदाबा हे अम्मानच्या नैऋत्येकडे ३० किमीवर वसलेले एक
ऐतिहासिक शहर. हे शहर रोमन साम्राज्याच्या काळात वसवले गेले. जॉर्डनमधील नबातिअन
साम्राज्याला शह देण्यासाठी या शहराचा लष्करी उपयोग होत असे. ख्रिस्ती धर्माच्या
प्रसाराचेही हे एक प्रमुख केंद्र होते. आज हे शहर प्रसिद्ध आहे ते तिथल्या मोझॅक
चित्रकृतींसाठी. मोझॅक म्हणजे रंगीत दगडांचे तुकडे विशिष्ट पद्धतीने मांडून बनवलेली
चित्रकृती. मदाबामध्ये ईसवी सनाच्या दुसऱ्या ते सातव्या शतकादरम्यान अशा असंख्य चित्रकृती
घडवल्या गेल्या. काळाच्या ओघात त्या चित्रकृती गाडल्या गेल्या. एकोणिसाव्या
शतकाच्या उत्तरार्धात काही घरांचे बांधकाम करताना मदाबाच्या उत्तर भागात पहिला
मोझॅक सापडला. त्यानंतर असंख्य मोझॅक सापडत गेले. या मोझॅकच्या माध्यमातून
इतिहासकारांना तत्कालीन जीवनाबद्दल बरीच उपयुक्त माहिती ज्ञात झाली.

जेरुसलेमचा नकाशा दाखवणारा मोझॅक |
या असंख्य मोझॅकपैकी सर्वात महत्त्वाचा मोझॅक
म्हणजे जेरुसलेमचा नकाशा. रंगीत दगडांचे तुकडे जमिनीवर लावून हा नकाशा बनवण्यात
आला. जेरुसलेमच्या पवित्र भूमीच्या आसपासचे डोंगर, नद्या, गावे, व्यापारी मार्ग अशा
महत्त्वाच्या भौगोलिक व सांस्कृतिक खुणा त्यात चितारलेल्या आहेत. याच नकाशावरून
संशोधकांनी जेरुसलेमच्या तत्कालीन रचनेचे प्रारूप बनवले. आज अर्धा-अधिक नष्ट
झालेला हा नकाशा त्याच्याभोवती चर्च बांधून संरक्षित केला आहे. या चर्चला ‘चर्च ऑफ
द मॅप’ असे म्हणतात. मदाबाला पोहोचताच आही पहिली भेट या चर्चला दिली. स्थानिक
पुरातत्त्व विभागाने मोठ्या कसोशीने त्या चर्चमधील नकाशाचे जतन केले आहे. शहरात
इतरत्र सापडलेले मोझॅक एका वस्तुसंग्रहालयात जतन करून ठेवले आहेत. हे मोझॅक
मुख्यत्वे पाना-फुलांची नक्षी, प्राणी, बायबलमधील घटना, व तत्कालीन दैनंदिन
जीवनातले प्रसंग दर्शवतात. हे संग्रहालय बघणे म्हणजे एक पर्वणीच होती. हजारो
वर्षांपूर्वी बनवलेल्या या कलाकृती तिथल्या गतवैभवाची साक्ष देत होत्या. असे
म्हणतात की मदाबातल्या अनेक घरांमध्ये तळघरात असे असंख्य मोझॅक आहेत. लोकांनी ते
पुरातत्त्व विभागापासून लपवून ठेवले आहेत. आपले वडिलोपार्जित घर सरकारच्या हवाली
करण्याची त्यांची अजिबात तयारी नाही.

वस्तुसंग्रहालयात असलेले विविधरंगी मोझॅक – नक्षीकाम |
वस्तुसंग्रहालयात असलेले विविधरंगी मोझॅक – दैनंदिन जीवन |
वस्तुसंग्रहालयात असलेले विविधरंगी मोझॅक – भूमितीय रचना |
मदाबा शहरापासून जवळच एक मोझॅक निर्मिती प्रशिक्षण
केंद्र आहे. त्याच्या शेजारीच एक वस्तुसंग्रहालयही आहे. सालेह आम्हाला तिथे घेऊन
गेला. ती वास्तू आधुनिक पद्धतीने बांधलेली होती. संग्रहालयात जॉर्डनचा इतिहास, संस्कृती,
जीवनपद्धती वगैरे विषयांवर दालने होती. एका दालनात जॉर्डनमध्ये प्राचीन काळी समाजजीवन
कसे होते यासंबंधी सेट उभारले होते. वंशपरंपरेने ठराविक व्यवसाय करणारे लोकसमूह
त्यात दाखवले होते. ते लोकसमूह आपसांत रोटी-बेटी व्यवहार करत नसत व आपल्या
व्यवसायाचा आणि समूहाचा त्यांना अभिमान असे. आजही असे काही समूह जॉर्डनमध्ये
आढळतात. तिथली मार्गदर्शक तरुणी मोठ्या उत्साहाने माहिती सांगत होती. काहीतरी सुपरिचित
असे ऐकल्यासारखे वाटत होते. आमची त्यावर काहीच प्रतिक्रिया नाही याचे त्या तरुणीला
आश्चर्य वाटले. मी मनात म्हटले, अशा लहान-सहान गोष्टींचे अप्रूप वाटायला आम्ही
काही शे-दोनशे वर्षांचा इतिहास असलेल्या देशातून आलेलो नाही! असो.

मोझॅक निर्मिती कार्यशाळा |
लवकरच ती तरुणी आम्हाला मोझॅक-निर्मिती
कार्यशाळेत घेऊन गेली. ही कार्यशाळा फारच रोचक होती. मोझॅक-निर्मितीच्या प्राचीन
कलेला आधुनिकतेचा साज देऊन तिचे जतन करण्याचा कौतुकासाद उपक्रम तिथे चालला होता.
अनेक स्थानिक तरुण-तरुणी संगणकाचा वापर करून मोझॅकसाठी लागणारे डिझाईन बनवत होते.
विशिष्ट प्रकारच्या वालुकाश्माला विविध रंगांनी रंगवले जात होते. त्याचे एका मशीनने
वेगवेगळ्या आकारात तुकडे पाडून डिझाईनवर लावले जात होते. केवळ सपाट पृष्ठभागच नव्हे,
तर मग, फुलदाणी, हंडा अशा गोलाकार वस्तूंवरही मोझॅक बनवले जात होते. त्यांनी
बनवलेल्या चित्रकृती अत्यंत सुबक दिसत होत्या. त्यांपैकी एखादा लहानसा मोझॅक विकत
घेण्याचा मोह मला आवरला नाही. ऑलिव्हच्या झाडाचे चित्र असलेला एक मोझॅक मी विकत
घेतला.

याच कार्यशाळेच्या प्रांगणात तीन दशलक्ष तुकड्यांनी बनवलेला महाकाय मोझॅक बनवण्याचे काम सुरु होते. पुढच्या काही वर्षांत हा मोझॅक हायवेवर मोक्याच्या
जागी बसवला जाणार होता. येणाऱ्या प्रत्येक पर्यटकास आपले नाव दगडाच्या एका
तुकड्यावर लिहण्याचे आवाहन तिथले विद्यार्थी करत होते. मी मोठ्या उत्साहाने माझे
नाव एका तुकड्यावर लिहले व तो मोझॅकच्या डिझाईन वर लावला. काही वर्षांनी तिथे
पुन्हा जायची संधी मिळाली तर आपल्या नावाचा तो तुकडा शोधणे अगदी मनोरंजक ठरेल.

मदाबामधले मोझॅक पाहून झाल्यावर सालेहने आमची
गाडी माउंट नेबोच्या दिशेने वळवली. जॉर्डनच्या पश्चिम सीमेवर, जॉर्डन नदीच्या
पूर्व काठाने एक डोंगररांग दक्षिणोत्तर पसरली आहे. यातलाच एक डोंगर म्हणजे माउंट
नेबो. यहुदी आणि ख्रिस्ती धर्मीयांमध्ये या ठिकाणास विशेष महत्त्व आहे. इथूनच
मोझेसला ‘प्रॉमिस्ड लॅंड’ दिसली होती अशी आख्यायिका प्रचलित आहे.

मोझेस हा अब्राहामिक धर्मांमधला एक महत्त्वाचा
प्रेषित. त्याचा जन्म इजिप्तमध्ये एका हिब्रू भाषक महिलेच्या पोटी झाला. प्राचीन
काळी इजिप्तच्या साम्राज्यात अनेक हिब्रू भाषक गुलामासारखे जगत होते. त्यांची
संख्या उत्तरोत्तर वाढत होती. अधिक मनुष्यबळ जमवून त्यांनी उठाव करू नये म्हणून इजिप्शियन
फॅरोहने सर्व हिब्रू भाषक लहान मुलांची कत्तल करायचे ठरवले. त्या दरम्यान मोझेसला त्याच्या
आईने लपवून ठेवले व तो बचावला. काही दिवसांतच फॅरोहच्या मुलीला मोझेस नाईल
नदीमध्ये एका टोपलीत ठेवलेला आढळला. तिने त्याचा सांभाळ केला. राजपुत्रासारख्या
वाढलेल्या मोझेसला आपल्या हिब्रू कुळाविषयी कसे कळले याबाबत धर्मग्रंथांमध्ये एकवाक्यता
नाही. मात्र मोठं झाल्यावर मोझेसने एका इजिप्शियन अधिकाऱ्याची हिब्रू गुलामांशी
जुलमाने वागत असल्याचे पाहून हत्या केली आणि तो वाळवंटात पळून गेला. तिथे त्याचा
देवाशी संवाद झाला व आपल्या हिब्रू बांधवांना मुक्त कर अशी आज्ञा देवाने त्यास
केली. त्यानुसार आपल्या भावाच्या मदतीने त्याने इजिप्तमधील हिब्रू बांधवांना मुक्त
केले व त्यांना घेऊन लाल समुद्र पार करून तो सिनाई पर्वताच्या प्रदेशात आला. तेथील
वाळवंटात बराच काळ भटकल्यानंतर अखेरीस माउंट नेबो वरून त्याला राहण्यास उपयुक्त
अशी जमीन दिसली. मात्र तेथेच त्याचा अंत झाला. त्याला त्याच परिसरात दफन करण्यात
आले. या कथेची ऐतिसाहिक सत्यासत्यता वादग्रस्त आहे. मात्र एक आख्यायिका म्हणून ती यहुदी
आणि ख्रिस्ती लोकांसाठी महत्त्वाची आहे.

माउंट नेबो वरून दिसणारे जॉर्डन नदीचे खोरे |
‘प्रॉमिस्ड लँड’ |
तर अशा या माउंट नेबो वर आम्ही पोहोचलो तेव्हा उन्हं माथ्यावर आली होती. हवेत गारवा
असला तरी कडक उन अंगाला टोचत होतं. समुद्रसपाटीपासून ८५० मीटर उंचीच्या त्या डोंगरमाथ्यावर
एक सुरेख चर्च बांधले आहे. तिथे पुनरुज्जीवनाचे काम सुरु होते. चर्चच्या मागच्या बाजूने
जॉर्डन नदीच्या खोऱ्याचा विस्तीर्ण प्रदेश दिसत होता. उघड्या-बोडक्या डोंगरांवर मधूनच
हिरवे पुंजके उगवलेले दिसत होते. दूर क्षितिजाजवळ काही घरे दिसत होती. हीच ती
पॅलेस्टाईनची भूमी. तिथे थोडा वेळ छायाचित्रण करून आम्ही गाडीकडे परतलो.

क्रमशः