असे म्हणतात की त्या काळी सूर्याच्या अयन रेषेच्या आधाराने गणित आणि खगोलशास्त्राचे प्रशिक्षण देण्यासाठी या मंदिराच्या वास्तूचा प्रयोग केला जाई. त्या काळी तंत्र परंपरेचा मोठा प्रभाव होता. या परंपरेचे साधक चौसष्ठ योगिनींची पूजा करत. योगिनींची पूजा करणारा हा संप्रदाय कमालीच्या गुप्ततेत असे. आजच्या घडीला या परंपरेचे कोणी उपासक अस्तित्वात आहेत की नाही याची काहीच कल्पना नाही. त्यांचे विधी, पूजा-अर्चा इत्यादींविषयी बाहेरील माणसाला कोणती माहिती मिळणे दुरापास्त. त्यामुळे या मंदिराविषयीही फार काही माहिती उपलब्ध नाही. किंबहुना १९४० पर्यंत हे मंदिर गुलदस्त्यातच होते.
Traversing Madhya Pradesh – Part 9 – Bateshwar Temple Complex | मध्य प्रदेशातली मुशाफिरी – भाग ९ – बटेश्वर मंदिर समूह
पहिला थांबा होता बटेश्वर मंदिर समूह. इथे साधारण सातव्या ते आठव्या शतकात गुर्जर प्रतिहार राजवटीत बांधली गेलेली सुमारे २०० मंदिरे आहेत. तेराव्या शतकात ही मंदिरे सम्पूर्ण जमीनदोस्त झाली. त्याचे कारण नक्की मुस्लीम आक्रमणे होते की भूकंप हे नक्की सांगता येत नाही. मात्र एकोणिसाव्या शतकात जेव्हा ही जागा पुन्हा निदर्शनास आली तेव्हा इथे दगडांचा नुसता ढिगारा होता. २००५ मध्ये के के मुहम्मद या ASI च्या अधिकाऱ्याने या मंदिरांची पुन्हा उभारणी करण्याचा विडा उचलला. तेव्हा हा सगळा भाग चंबळ खोऱ्यातील दरोडेखोरांच्या हातात होता. मुळातच हा भाग कित्येक दशकांपासून दरोडेखोरांसाठी कुप्रसिद्ध होता. मात्र मुहम्मद यांनी त्यांच्या म्होरक्याला हे समजावले की मंदिरे त्यांच्या पूर्वजांनी बांधलेली आहेत. मग तो पुनर्स्थापनेस मदत करण्यास राजी झाला.