Football and Me | फुटबॉल आणि मी

पुढच्याच आठवड्यात जर्मनी विरुद्ध अर्जेन्टिना असा अंतिम सामना होता. जर्मन लोकांत जणू उत्साहाचं वारं शिरलं होतं. सगळ्यांचे प्लॅन बनत होते. मीही एक भारतीय मित्र आणि त्याच्या ग्रुपसोबत जायचं ठरवलं. या वेळी बार माझ्या घरापासून तसा लांब होता. तसा मी कायम सायकलीने फिरायचो. पण आज अंतिम सामना म्हटल्यावर पोलीस बंदोबस्त असेल. मग बारमधून निघताना कोणी पकडलं तर? उगाच कशाला रिस्क? असा विचार करून मी सरळ ट्राममध्ये चढलो. यथावकाश सामना सुरु झाला.

Beach trail of Karnataka: Kumta to Gokarna – Part 5 – Leftover beaches and the story of lost camera | कर्नाटकातली किनाराभ्रमंती : कुमटा ते गोकर्ण – भाग ५ – उरलेसुरले किनारे आणि न हरवलेला कॅमेरा

हाफ मून बीचवरच्या विश्रांतीनंतर आम्ही पुढच्या बीचकडे निघालो. समोर अर्थातच एक टेकडी दिसत होती. ही आत्तापर्यंतची सगळ्यात उंच टेकडी असेल. वाटेने गर्द झाडी होती. चांगला तास लागला वर चढायला. आता पुढची वाट टेकडीच्या धारेने जात होती. डाव्या हाताला समुद्र गर्जत होता. उतारावर वाढलेली माडाची झाडं मोठ्या कसोशीने वाऱ्याशी झुंज देत उभी होती. थोड्या वेळातच वाट पुन्हा गर्द झाडीत शिरली. पानांच्या जाळीतून दुपारचं कडक उन हिरवं होऊन खाली झिरपत होती. लाल मातीतली पायवाट आणि ते हिरव्या छटेचं उन एक वेगळीच वातावरणनिर्मिती करीत होते. आता वाट उतरू लागली. हळूहळू झाडांची दाटी कमी होऊ लागली आणि समुद्र दिसू लागला.