या असंख्य मोझॅकपैकी सर्वात महत्त्वाचा मोझॅक
म्हणजे जेरुसलेमचा नकाशा. रंगीत दगडांचे तुकडे जमिनीवर लावून हा नकाशा बनवण्यात आला. जेरुसलेमच्या पवित्र भूमीच्या आसपासचे डोंगर, नद्या, गावे, व्यापारी मार्ग अशा महत्त्वाच्या भौगोलिक व सांस्कृतिक खुणा त्यात चितारलेल्या आहेत. याच नकाशावरून संशोधकांनी जेरुसलेमच्या तत्कालीन रचनेचे प्रारूप बनवले. आज अर्धा-अधिक नष्ट झालेला हा नकाशा त्याच्याभोवती चर्च बांधून संरक्षित केला आहे. या चर्चला ‘चर्च ऑफ द मॅप’ असे म्हणतात.