खजुराहोचे पूर्वीचे नाव खर्जूरवाहक असे होते. इथे मोठ्या संख्येने असलेल्या खजुरांच्या झाडांमुळे हे नाव पडले असावे. जवळच असलेले महोबा म्हणजे चंडेल राजांची राजधानी होती. चंडेल राजांनी नवव्या ते तेराव्या शतकांदरम्यान मध्य भारतावर राज्य केले. त्यांपैकी यशोवर्मन आणि धंगदेव राजांची राजवट म्हणजे चंडेल साम्राज्याचा सुवर्णकाळ मानला जातो. त्यांच्याच कारकिर्दीत ही प्रसिद्ध मंदिरे बांधली गेली.