Colorful Bastar – Part 4 – Bastar Dushera: a unique folk celebration | विविधरंगी बस्तर – भाग ४ – बस्तर दशेरा – एक अद्वितीय लोकोत्सव

अनवट निसर्गासोबत लोकजीवन नाही अनुभवले तर बस्तरची सहल अपूर्णच! त्यात दसऱ्याच्या सुमारास तुम्ही बस्तरमधे असाल […]

Colorful Bastar – Part 3 – Mendri Ghumar Waterfall and Traditional Cuisine of Bastar | विविधरंगी बस्तर – भाग ३ – मेंद्री घुमड धबधबा आणि बस्तरचे पारंपरिक भोजन

कॅम्पसाईटवर परतलो तेव्हा दोन वाजत आले होते. जेवण तयारच होते. पारंपरिक पद्धतीचे भोजन अनुभवायला आम्ही फारच उत्सुक होतो. सगळेजण मनोऱ्याच्या गच्चीवर जमलो. स्थानिक आचारी पानांच्या द्रोणातून एक-एक पदार्थ वाढू लागले. बस्तर मधला आहार हा मुख्यत्वे मांसाहारी आहे. स्थानिक आदिवासींना रानातला कोणताही प्राणी व्यर्ज नाही. थोडीफार भात आणि काही इतर धान्यांची शेती होते. त्यावर आधारीत काही पदार्थ त्यांच्या आहारात बघायला मिळतात. आजच्या मेनूमध्ये बांबूच्या मोडांची करी, पालकाची भाजी, डाळ, आणि भात असे त्यातल्या त्यात शहरी लोकांना खायला जमतील असे पदार्थ होते. शिवाय एक चिंचेची आंबट-गोड चटणीही होती. आम्ही जेवणावर मस्त ताव मारला.

Colorful Bastar – Part 2 – Chitrakot Waterfall | विविधरंगी बस्तर – भाग २ – चित्रकोट जलप्रपात

पक्ष्यांच्या किलबिलाटाने पहाटे पावणेसहालाच जाग आली. पहाटेचा गारवा आल्हाददायक वाटत होता. तंबूच्या बाहेर आलो आणि […]

Colorful Bastar – Part 1 – Introduction to Bastar | विविधरंगी बस्तर – भाग १ – बस्तरची तोंडओळख

बस्तर म्हणजे दक्षिण-पूर्व छत्तीसगढमधला ओदिशाच्या सीमेला लागून असलेला जिल्हा. दख्खनचे पठार आणि पूर्व घाट यांच्या सीमेवर असलेला बस्तर जिल्हा समुद्रसपाटीपासून सुमारे ६०० मीटर उंचीवर वसलेला आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात हे एक संस्थान होते. सध्याचे बस्तर, दांतेवाडा आणि कांकड असे तीन जिल्हे मिळून या संस्थानाचा पसारा होता. साधारण १५०००० लोकवस्ती असलेले जगदालपूर आज जिल्ह्याचे मुख्यालय आहे. जिल्ह्यातली ७०% लोकसंख्या आदिवासी असून गोंड, भरता, आणि मारिया या त्यांपैकी मुख्य जमाती होत. बऱ्याच जमाती अजूनही सुदूर घनदाट अरण्यांत राहतात आणि बाहेरील लोकांशी फारशा मिसळत नाहीत. पूर्वापार चालत आलेल्या त्यांच्या प्रथा-परंपरा अजूनही टिकून आहेत. बस्तरमध्ये दसऱ्याच्या दिवशी होणारा लोकोत्सव हा सुप्रसिद्ध आहे.

Tambadi Surla Trek – Part 2 – The Waterfall and Mahadev Temple | तांबडी सुर्ला ट्रेक – भाग २ – धबधबा आणि महादेव मंदिर

एक वळण पार केले आणि अचानक दोन झाडांच्या मधून एक फेसाळता पांढरा पडदा दृष्टीस पडला. क्षणभर कळेचना हे पाणी आहे की ढग आहेत! थोडे अजून वर चढलो आणि त्या अखंड जलप्रपाताचे दर्शन झाले. गर्द वनराई नेसलेल्या त्या उंच पहाडावरून पाणी घोंघावत खाली कोसळत होते. पडता पडता त्याच्या अनेक शाखा-उपशाखा बनत होत्या. कातळ-कपाऱ्यांत खेळून त्या पुन्हा मुख्य प्रवाहास बिलगत होत्या. पाण्याचे ते रूप पाहून मी क्षणभर स्तब्धच झालो. सारा थकवा क्षणार्धात दूर झाला. थोडा वेळ ते सारे दृश्य नजरेत सामावून मी कॅमेरा बाहेर काढला. त्या जागेवरून फोटो फेसबुक डीपी काढण्यात आम्ही सारेच मग्न झालो. डाव्या बाजूने एक वाट थोडी खाली उतरत धबधब्याच्या दिशेने जात होती. प्रवाहाच्या थोडं जवळ जाता यावं म्हणून तिथून खाली उतरलो.

Tambadi Surla Trek – Part 1 – The Trail through a Dense Forest | तांबडी सुर्ला ट्रेक – भाग १ – घनदाट अरण्यातली पाऊलवाट

मंदिराच्या बाहेरून रानात शिरणारी ती तांबूसराड वाट आम्ही धरली आणि मोठ्या उत्साहात पुढे निघालो. पाचेक मिनिटातच गर्द रानाच्या मध्यात पोहोचलो. रानाचा तो विशिष्ट वास आसमंतात भरून राहिला होता. बाजूनेच एक ओढा खळाळत होता. मी लगेचच कॅमेरा बाहेर काढला. नशिबाने पाऊस नव्हता. इकडे-तिकडे फोटो काढत आमचा ट्रेक सुरु होता. पावसाळी ट्रेकिंग मध्ये वाटेत येणारे ओढे पार करणे म्हणजे एक वेगळेच प्रकरण असते. विशिष्ट दगडांवर पाय टाकत, तोल सावरत, कमीत कमी ओले होत पुढे जायचा उगीच प्रयत्न करायचा. मग शेवटी थोडा भिजलोच आहे अजून भिजूया असे म्हणून पाण्यातच बसकण मारायची! इथला ओढा काही त्याला अपवाद नव्हता.

Unforgettable Roopkund – Part 7 – All’s Well That Ends Well | अविस्मरणीय रूपकुंड – भाग ७ – शेवटचा दिस गोड व्हावा!

चढण संपता संपता एक गाव लागलं. आम्ही ट्रेकर्स दिसताच गावातली लहान-सहान पोरं गलका करत जमा झाली. आपल्या गोड आवाजात ती पोरं सगळ्यांना नमस्ते म्हणत होती. ट्रेकच्या या शेवटच्या दिवशी पोरांमध्ये वाटायलाही काही उरलं नव्हतं. पाऊस आता थांबला होता. गावाशेजारी एक हॉटेल होतं. तिथे थोडा वेळ थांबून आम्ही पुढे निघालो. लहान-मोठ्या वस्त्यांमधून ती वाट पुढे जात होती. काही वेळातच थोडे मोठे गाव दिसू लागले. वाण गावच्या मुख्य चौकात उतरणारी ती शेवटची पायरी आम्ही उतरलो आणि अत्यानंदाने एकमेकांना टाळ्या दिल्या. ट्रेक संपल्याचा तो क्षण म्हणजे अवर्णनीय असाच होता. गावातल्याच एका दुकानात चहा पिऊन आम्ही तो ट्रेकांत साजरा केला.

Unforgettable Roopkund – Part 6 – The Unseen Lake | अविस्मरणीय रूपकुंड – भाग ६ – हुकलेले कुंडदर्शन

रघू म्हणाला, AMS (acute mountain sickness) काही सांगून येत नाही. कोणतीही पूर्वलक्षणे न दिसताही त्या उंचीवर माणूस अचानक आजारी पडू शकतो. आजार बळावला तर त्याला खाली आणण्याशिवाय गत्यंतर नसते. आणि वेळेत खाली आणता नाही आले, तर मृत्यूही ओढावू शकतो. या सगळ्या शक्यतांची मला ऐकून-वाचून माहिती होती. पण त्या परिस्थितीचा प्रत्यक्ष अनुभव आत्ता पहिल्यांदाच येत होता. उगीच विषाची परीक्षा कशाला? कोण बक्षीस देणार आहे मला कुंडापर्यंत गेल्याचं? जे करतोय ते निव्वळ निसर्गप्रेमासाठी आणि त्यातून मिळणाऱ्या आत्मिक समाधानासाठी. मग उगीच जीव कशाला धोक्यात घालायचा?

Unforgettable Roopkund – Part 5 – At the Base of Roopkund | अविस्मरणीय रूपकुंड – भाग ५ – रूपकुंडच्या पायथ्यावर

आभाळातले रेंगाळलेले ढग आता दूर पसार झाले होते. त्रिशूल शिखराच्या मागून वर आलेले सूर्यबिंब तेजाने तळपत होते. बुग्यालमधल्या गारव्यात त्या तेजाची ऊब हवीहवीशी वाटत होती. एक लहानशी चढण पार करून आम्ही कालच्याच डोंगरधारेवर येऊन पोहोचलो. तीच अजगर-वाट आणखी काही वेटोळे घेत अजून वर जात होती. आम्ही हळूहळू त्या वाटेने वर चढू लागलो. बॅगेचे ओझे नसल्याने तीच वाट आज अनेक पटींनी सोपी वाटत होती. चढण मंद होती. पण ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे दम लागत होता. तासाभरात त्या डोंगरधारेच्या माथ्यावर पोहोचलो.

Unforgettable Roopkund – Part 4 – Never-ending trail of Ali Bugyal and Bedini Bugyal | अविस्मरणीय रूपकुंड – भाग ४ – अली बुग्याल ते बेदिनी बुग्याल : एक न संपणारी डोंगरवाट

ट्रेकिंगमध्ये एक असतो शरीराचा गियर आणि एक असतो मनाचा गियर. पहिला गियर सुदृढ असावा लागतोच, पण दुसरा त्याहून मजबूत. दुसरा गियर जर ढासळू लागला तर ट्रेक संपलाच म्हणून समजा. त्या नागमोडी वाटेवर माझ्या शरीराचा गियर न्यूनतम पातळीवर चालला होता. सगळी उर्जा संपल्यागत होती. पण मनाचा गियर मात्र अजून सुदृढ होता. त्या जागेवरून मागे वळणे हा पर्यायच उपलब्ध नव्हता. कारण डिडनापासून बरेच  अंतर आम्ही पुढे आलो होतो. त्यामुळे मनाला कितीही वाटलं, इथेच थांबावं, तरी तो काही व्यवहार्य पर्याय नव्हता. त्यामुळे मी स्वतःला पुढे रेटायचा निर्णय घेतला. दहा पावले चालणे आणि दोन मिनिटे थांबणे अशा तालात मी पुढे चाललो होतो.