खजुराहोची मंदिरे जगभर प्रसिद्ध होण्यामागचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे यांवर असलेली मैथुनशिल्पे. एकूण शिल्पाकृतींपैकी १०% शिल्पाकृती या मैथुन म्हणजेच कामक्रीडेशी संबंधित आहेत. जवळपास सर्वच मंदिरांवर ही शिल्पे आढळतात. भारतीय समाजात आजही सेक्स हा विषय फारसा मोकळेपणाने बोलला जात नाही. कामेच्छा म्हणजे वासना आणि ती हीनच असा सर्वसाधारण हेका दिसतो. त्या पार्श्वभूमीवर आपल्या पूर्वजांनी मंदिरांसारख्या वास्तूंवर केलेले मानवी कामजीवनाचे हे उत्कट चित्रण विशेष महत्त्वाचे ठरते. खरेच प्राचीन भारत सेक्सबाबत उदारमतवादी होता का?