खजुराहो मध्ये एकूण ८५ मंदिरे होती. किंबहुना, ८५ मंदिरांच्या अस्तित्वाचे पुरावे उपलब्ध आहेत. त्यांपैकी आज केवळ २२ मंदिरे उभी आहेत. या मंदिरांचे तीन मुख्य समूह आहेत – पूर्व, पश्चिम, आणि दक्षिण. पश्चिम समूह हा मुख्य समूह समजला जातो. इथली ११ मंदिरे ASI ने संरक्षक भिंत आणि सभोवती उद्यान वगैरे उभारून जतन केली आहेत. हा समूह हॉस्टेलच्या समोरच होता. इथे संध्याकाळी लाईट अँड साउंड शो असतो. त्यामुळे हा समूह संध्याकाळी बघायचा आणि तसेच शो बघायला जायचे असे मी ठरवले.
Traversing Madhya Pradesh – Part 1 – Mumbai to Khajuraho via Delhi | मध्य प्रदेशातली मुशाफिरी – भाग १ – मुंबई ते खजुराहो व्हाया दिल्ली
खजुराहो – दहाव्या शतकातल्या मंदिरांसाठी सुप्रसिद्ध असलेली जागा. त्याहून प्रसिद्ध म्हणजे इथली गूढ मैथुनशिल्पे! परदेशात असताना बरेच जण विचारायचे त्याबद्दल. किंबहुना खजुराहो पाहून आलेले लोक मला भारतापेक्षा परदेशातच जास्त भेटले असतील! तर अशी जगप्रसिद्ध जागा बऱ्याच वर्षांपासून बकेटलिस्ट वर होती. त्या जोडीने ओरछा आणि ग्वालियरविषयीही ऐकून होतो. शेवटी एकदा सुट्टीचा योग जुळवून आणला आणि खजुराहो – ओरछा – ग्वालियर अशी सहा दिवसांची सहल ठरवली. प्रत्येक जागेसाठी साधारण दीड ते दोन दिवस ठरवले.